कोरोना काळ : अस्तित्वाचा खरा अर्थ शोधण्याची संधी गौरी जानवेकर १८ जुलै २०२०

कोविड १९ मुळे आपण सगळेच अनेक वेगळ्या अनुभवांना सामोरे गेलो आणि अजून पुढील काही महिने जाणार आहोत. आपण कधीच करणार नाही अशा अनेक गोष्टी आपण या काळात केल्या आणि जे आपण कायम करत राहू असं आपल्याला वाटलं अशा अनेक गोष्टींपासून आपल्याला बराच काळ वंचित राहावे लागले. कोरोना आणि लॉकडाऊन दोन्हीचे वेगळे मानसिक परिणाम आपण सगळ्यांनी अनुभवले. संसर्ग होण्याच्या भीतीपासून भविष्यात काय मांडून ठेवलंय अशा चिंतेपर्यंत स…